अभयसिंग मोहिते

माझ्या यशामध्ये रंजन कोळंबे सर आणि सरांच्या पुस्तकांचा मोलाचा वाटा आहे. सरांच्या Mock Interview चा मला खूप फायदा झाला.

अभयसिंग मोहिते- ((Dy. Collector) राज्यात प्रथम)

समाधान शेंडगे

सरांच्या पुस्तकांचा मला UPSC व MPSC दोन्ही परीक्षांसाठी खूप फायदा झाला आहे, आणि मी सलग दोन वर्ष सरांकडे Mock Interview दिला, सरांनी विचारलेली प्रश्नच मला आयोगाच्या प्यानालमध्ये विचारण्यात आले.

समाधान शेंडगे- ((Dy. Collector) राज्यात व्दितीय)

प्रशांत खेडेकर

MPSC चा अभ्यास सुरु करतांना सर्वात पहिले पुस्तक वाचलं ते रंजन कोळंबे सरांचे 'भारतीय अर्थव्यवस्था'. माझ्या यशामध्ये सरांच्या सर्व पुस्तकांचा सिंहाचा वाटा आहे.

प्रशांत खेडेकर- (Dy . Collector राज्यात तृतीय )

वनश्री लभशेटवर

रंजन कोळंबे सरांच्या Interview चा मला खूप फायदा झाला. माझ्यातल्या Positive Quality आणि अजून काय करण्याची गरज आहे, याचे खूप चांगले मार्गदर्शन केले आणि Interview लेक्चरमध्ये पण मुलांनी कुठल्या विषयाचा अभ्यास करावा यापासून कुठला पोशाक घालून Interview ला जावे इथपर्यंत सरांनी मुलांना मार्गदर्शन केले. रंजन सरांसारखे मार्गदर्शन कोणी करू शकत नाही.

वनश्री लभशेटवर- (Dy . Collector मुलींमध्ये राज्यात प्रथम )

स्नेहल कनिचे

रंजन कोळंबे सर म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानमूर्ती, मार्गदर्शनाबरोबर जिद्द, चिकाटी ! जे येथील भागीरथी ते नक्कीच होतील अधिकारी ! भगीरथ प्रयत्न व रंजन मार्गदर्शन यामुळे अशक्य स्वप्न सहज सोपे झाले.

स्नेहल कनिचे- (Dy . Collector)

शैलेश काळे

MPSC अपयाशावरील पहिली मात, पावलो-पावली भगीरथची साथ !

शैलेश काळे- (Dy. SP)

डॉ. आरती जाधव

MPSC च्या नव्या परीक्षा पद्धतीमुळे यशस्वी व्हायचे असेल तर विषयाच्या सखोल माहिती बरोबरच त्या माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमत आणि विषयाच्या मुलभुत संकल्पनांचे संपूर्ण आकलन आवश्यक ठरते. या गोष्टी सहज साध्य झाल्या कोळंबे सरांच्या मार्गदर्शनामुळेच अवघड संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून देण्याच्या सरांच्या हातोरीमुळे Economics , भूगोल, राज्यशास्त्रातील क्लिष्ट संकल्पनाही त्यातील बारकाव्यासह समजल्या. भगीरथ प्रकाशनाच्या पुस्तकातून सर्व विषयांच्या परिपूर्ण आणि अश्ययावत माहिती मिळाली. Mock Interview मध्येही सरांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले. एकूणच परीक्षेतील सर्वच टप्प्यातील यशात कोळंबे सरांचा आणि त्यांच्या टीमचा महत्वाचा वाटा आहे. त्यांच्या या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांची सदैव ऋणी राहीन.

डॉ. आरती जाधव- (Dy . Collector )

Shital Deshmukh

kolambe sir helped me in my interview preparation.Sir suggested some really good questions on my bio data. Besides I used Bhagirath's books for mains which were very useful.

Shital Deshmukh- (Dy. Collector)

रणजित पाटील

ज्या प्रमाणे श्री कृष्णाचे सारथ्य हि अर्जुनाच्या यशाची गुरुकिल्ली ठरली, त्याप्रमाणे रंजन सरांचे मार्गदर्शन हिच माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे हे मी मानतो. MPSC & UPSC मध्ये यश मिळविण्यासाठी रंजन सरांचे मार्गदर्शन आणि रंजन सरांची पुस्तके याशिवाय कुठलाही पर्याय नाही. महाराष्ट्रात सर्व यशस्वी झालेले विद्यार्थी हे सरांशी पुस्तक स्वरुपात जोडलेले असतातच.

रणजित पाटील- (Dy. SP)

Aanad Deulagavakar

MY OPINION ABOUT RANJAN KOLAMBE SIR AND BHAGIRATH ACADEMY... For MPSC exam थे most important step is selection of material and in this thing the material of Bhagirath Academy has no challenge. It is very helful and inclusive. As for as Ranjan sir is considered, hi is very helpful in nature and energetic person..... His tips for interview helps me lot- In a single line Ranjan Kolambe means one man army........

Aanad Deulagavakar- (Tahsildar Group A)

Thank you kolambe sir for your sincere support. Your valuable suggestions and good books truly helped me in clearing MPSC.

कैलास अंदिल- (Tahsildar )

भूषण जोशी

माझ्या या यशात भगिरथचा मोठा वाट आहे. मी MPSC चा अभ्यास part time करत होतो. मी पूर्ण वेळ एका ऑटो मोबाईल कंपनीत काम करत होतो. या अभ्यासाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच भगिरथचा उत्कृष्ट अभ्यास साहित्याचा मला फायदा झाला.कमी वेळेत जास्तीत जास्त मुद्दे कव्हर करण्यासाठी श्री. रंजन सरांच्या Economics च्या Book ला पर्याय नही. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यासाठी श्री. रंजन सरांचे मार्गदर्शन घेतले, त्याचा मला खूप फायदा झाला.

भूषण जोशी- (Dy . CEO - BDO Class - 1)

सतीश बुद्धे

रंजन कोळंबे सरांची संदर्भ ग्रंथ हे MPSC सुरु करणाऱ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली ठरत आहेत. माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना MPSC मध्ये करीअर होऊ शकते असा आत्मविश्वास सरांची पुस्तके वाचल्याने झाला आहे. विद्यार्थ्यांनी जीद्द सोडू नये,पाऊले पुढे पडत गेल्यास मार्ग नक्कीच सापडतोच. MPSC चा अभ्यास केवळ परीक्षापुरताच मर्यादित नसून तो व्यक्तिमत्व घडविण्याचा राजमार्ग आहे. आदर्श व सुज्ञ अधिकाऱ्यांबरोबरच तसेच नागरीकही समाजाला आवश्यक आहेत, ते MPSC च्या अभ्यासातूनच घडतात. सरांनी उपलब्ध करून दिलेल्या ग्रंथभंडाराबद्दल मन:पुर्वक आभार....... विद्यार्थ्यांना भावी यशासाठी शुभेच्छा- - -

सतीश बुद्धे- (Dy. CEO/BDO)

प्रिया बेंम्बरे

पुण्यात क्लास लावण्याबद्दल विचार केला तेव्हा मित्र मैत्रिणीना एकच सांगितलं की क्लास लावायचा तर फक्त भागीरथाचाच. क्लासला सुरुवात झाल्यानंतर ते अस का म्हणाले हे समजलं..... कारण श्री रंजन कोळंबे सारंच प्रत्येक विषयाबद्दलच असलेले सखोल ज्ञान व कुठलीही बाब समजावून सांगण्यात असलेली महारथ. जो विषय स्वतः समजायला महिने लागतात, तो विषय सर सहज एका क्लास मध्ये समजावून सांगतात. आज मी माझ्या पहिल्याच प्रयत्नात उप अधीक्षक भूमी अभिलेख चा माझ्या यशामध्ये श्री. रंजन कोळंबे सर यांचे मार्गदर्शन व भगीरथ क्लासचा सिहाचा वाट आहे.

प्रिया बेंम्बरे- (DSL)

डॉ. संभाजी मोतीबोने

माझ्या या लहान यशात माझ्या आई वडिलांचा खूप मोठा हात आहे. तसेच भगीरथ आक्यादमी व श्री. रंजन कोळंबे सर यांचे मार्गदर्शन लाभले. अभ्यास करताना मला सरांनी लिहीलेली पुस्तके खूप फायदेशीर ठरली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी ही पुस्तके आवर्जून वाचावीत असे मला वाटते.

डॉ. संभाजी मोतीबोने- (Dy . Superintendent Land Records)

अतुल गांगुर्डे

खरे तर सर्व महाराष्ट्रात जो मुलगा UPSC - MPSC ही स्पर्धा परीक्षा जेव्हा करण्याचा निर्णय घेतो, आणि तो जेव्हा यशस्वी मित्रांकडे पुस्तकाची यादी मागतो तेव्हा त्या यादीमध्ये तुमच्या पुस्तकांचे नाव असतेच असते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि मला असे वाटते आपली पुस्तके मला जे यश मिळाले आहे त्यात भगीरथ प्रकाशनाचा खूप - खूप मोलाचा वाटा आहे. सर आपल्या पुस्तकांमध्ये माहिती आणि नॉलेजच उत्तम संगम झाला आहे. कारण नुसती माहिती देऊन चालत नाही तर त्याचे नॉलेजमध्ये रुपांतर होणे गरजेचे असते. आयोगाचे प्रश्न विचारण्याचे बदलते स्वरूप समजून घेऊन तुम्ही जी पुस्तक आणि Syllabus Coverage केले आहे त्याला जोड नाही. मला माझ्या यशात विविध प्रकारच्या तुमच्या पुस्तकांचा खूप - खूप फायदा झाला, आणि भविष्यात देखील होत राहील याची खात्री आहे. खरे तर हे यश माझ्या एकट्याचे नसून यात माझे आई वडील यांनी आपल्या घामाची फुल करून माझे आयुष्य फुलविले, माझे मोठे बंधू, तसेच तुमच्या सारखे मानवी विद्यापीठ यांचा मोलाचा वाटा आहे. तेव्हा तुमच्या ह्या सर्व Books चा माझ्या स्पर्धक मित्रांना नक्कीच फायदा होतो यात काही शंका नाही. तुमच्या पुढील वाटचालीस खूप - खूप शुभेच्या अशीच दर्जेदार आणि स्पर्धात्मक पुस्तक आपल्या कडून तयार होऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या मित्राना त्यांच्या अशासाठी खूप - खूप शुभेच्या देतो..... जय हिंद.

अतुल गांगुर्डे- (Naib . Tahsildar )

मंदार इंदुरकर

स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी अत्यावश्यक अशा तीन गोष्टी म्हणजे प्रामाणिक प्रयत्न, उत्तम मार्गदर्शन व दर्जेदार साहित्य. माझ्या यशात श्री कोळंबे सरांनी शेवटच्या दोन गोष्टींची जबाबदारी अतिशय योग्य प्रकारे पूर्ण केली आहे. विशेषतः मला मुलाखतीच्या वेळी कोळंबे सरांचे अमुल्य मार्गदर्शन मिळाले. चालु घडामोडी तसेच स्वतःच्या व्यक्तिमत्वा विषयी प्रश्न कसे हाताळावेत याचे उचित मार्गदर्शन मला मिळाले. माझ्या यशात सरांचा सिहांचा वाट आहे.

मंदार इंदुरकर- (Naib . Tahsildar)

ओंकार ठाकरे

जसे क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूला आदराचे स्थान असते त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील एक असामान्य अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. कोळंबे सर होय. परीस स्पर्शाने ज्याप्रमाणे लोखंडाचेही सोने व्हावे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील असंख्य तरुणांच्या जीवनात सुवर्णरुपी प्रकाश सतत ठेवणारी विश्वास व सामर्थ्याची ज्योत म्हणजे सर होय. प्रत्येक विषयाचं असलेले सखोल ज्ञान, वेळेची तत्परता, कधीही विध्यार्थ्यांसाठी उपलब्ध व इतके सर्व करूनही सदैव प्रसन्न, वर्गात शिकवितांना केवळ विषयानुसार मर्यादित ज्ञानाचं न पोहोचवता इतरही अवांतर ज्ञान प्राप्त होणे हि विद्यार्थांसाठी पर्वणीच असते. अशा प्रकारे अभ्यास करा असे सांगणारे भरपूर परंतु ते करांना कोणत्या गोष्टी टाळाव्या हे सांगणारे कमी. दहा पुस्तके एकदा वाचण्यापेक्षा एक पुस्तक दहा वेळा वाचा हा सरांचा मूलमंत्र. Person Shouldn't be master of one but should be jack of all हे तत्व त्यांनी आपच्यामध्ये पुरेपूर रुजविले. आज भारतीय अर्थव्यवस्था, भारताची राज्यघटना, विज्ञान तंत्रज्ञान व विकास, मानव संसाधन व विकास तसेच सरांच्या इतरही पुस्तके म्हणजे MPSC - UPSC च्या विद्यार्थांना जीव के प्राणच बनला आहे. या पुस्तकांच्या माध्यमातून क्ठीनातल्या कठीण संकल्याना अगदी सोप्या भाषेत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यापर्यंत पोहोचविण्याचे इंद्रधनुष्य पेललेले आहे. सर नेहमी सांगतात की, जर तुम्हाला तुमच्या ध्येयावर ध्येय प्राप्तीच्या साधनांवर व गुरूंवर श्रद्धा असेल व सोबत कठोर परिश्रमाची सांगड असेल तर यशापासून आपणास कोणीही रोखू शकणार नाही. आपल्या ज्ञानाचा आवाका हा एका परीक्षेपुरातच मर्यादित न ठेवता त्याचा आपल्या जीवनात कसा उपयोग करता येईल व एक सुजाण नागरिक, अधिकारी निर्माणाचे कार्य भगीरथ IAS Academy च्या माध्यमातून चालू आहे. पूर्व, मुख्य व मुलाखत या तीनही टप्यांमध्ये श्री. कोळंबे सर यांच्या मार्गदर्शनाची साथ माळली. विशेषता CSAT ला Tackle कसे करायचे, मुख्य परीक्षेत GS च्या चारही पेपर मध्ये Strategy कशी असावी, एखादया कठीण Topic ची आवडीने तयारी कशी करावी हा सर्वसमावेशक दृष्टीकोन मिळाला. मुलाखती बाबत माझ्या मनात फार भीती होती परंतु सरांकडे Mock Interview मुले आत्मविश्वास वाढला व त्यामुळेच आयोगाच्या प्रत्यक्ष मुलाखतीत चांगले चारीद्नी मला मिळाले याचे सर्व श्रेय सरांनाच जाते. मित्रानो कुठलेही यश प्राप्त करायचे असेल तर स्वतासोबातच प्रामाणिक राहा व काम कुठलेही करा पण त्या कामाला गर्व झाला पाहिजे कि ते तुमाच्याव्दारे पूर्ण होत आहे. त्यासाठी Prioritie ठरवा व त्यानुसार नियोजन करा. सरांनी लावलेल्या भागीरात रुपी वृक्ष अधिक बहरत जावो व त्यामुळेच आमच्या सारख्या ग्रामीण भागातील विध्यार्थी अधिकारी म्हणून सामोरे येतील व आपल्याला विचारांचे अमृत स्वताच्या माध्यमातून समाजात रुजवतील. इतरांसाठी सर म्हणजे केवळ मार्गदर्शक असतील पण माझ्यासाठी ते माझ्या आई वडिलांप्रमाणे दैवत आहे. सर्व विध्यार्थानी सरांचे वाक्य कायम लक्षात ठेवावे. Don't feel low when someone Doubts your caliber. Just be proud of yourself. Because people always dount the 'Gold ' for its purity, not the iron.

ओंकार ठाकरे- (Naib . Tahsildar)

सचिन आखाडे

मी Interview guidance साठी कोळंबे सरांकडे आलो होतो. सरांनी अगदी सोप्या पद्धतीने Interview चा Approach कसा असावा, होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात, Current to pics कसे हाताळावेत या विषयी खूप चांगलं मार्गार्दर्शन केले. ज्याचा प्रत्येक्ष Interview मध्ये खूप फायदा झाला. यशाचे गमक - मी BMC मध्ये Engg आहे. जॉब करताना MPSC पास होत नाही असा खूप लोकांकडून ऐकेल होत. मनात ठरवलं आणि 2nd Attempt मध्ये ना. तहसीलदार झालो. मला वाटल की, जर ध्येय (टार्गेट) स्पष्ट असेल तर तिथे पोहोचण्याचा मार्ग आपोआप सापडत जातो.

सचिन आखाडे- (Naib . Tahsildar )

आकाश किसवे

भगीरथ acadamiche pustake खूप Detail ani navin अभ्यास kramanusar chan asatat. कोळंबे srani मला Personally खूप madat keli. majha en veles Interview Arrange केला.

आकाश किसवे- (Naib . Tahsildar)

सुनिल मुनाळे

स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाची सुरुवात रंजन कोळंबे सरांच्या मार्गदर्शनाने झाली. कोळंबे सरांमुळे अभ्यासाची योग्य दिशा मिळाली. काय वाचावे ? यापेक्षा काय वाचू नये ? याचे मार्गदर्शन मिळाले. सरांचे अनेक विषयांवर सखोल व व्यापक पकड आहे त्याचा लाभ क्लासमधील विद्यार्थ्यांना मिळत असत. भगीरथ क्लासेस हे महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षा विश्वातील एक विश्वसनीय केंद्र आहे असे म्हणावयास हरकत नाही.

सुनिल मुनाळे- (Naib. Tahsildar)

मिलिंद मोहिते

गुंतागुंतीचं अर्थशास्त्र सोप्या ओघवत्या शैलीत पहिल्यांदा समजलं होतं ते रंजन सरांमुळे ! माझे गुण का जातात किंवा मला या विषयाची भिती का वाटते, त्या व्यावहारिकतेपेक्षाही मला अर्थव्यवस्थेविषयी गोडी लागली त्यात आणखीन भर पडण्यासाठी सरांच्या शिबिरांनाही उपस्थित राहायचो झंझावाताप्रमाणे शिबिरे घेण्याची प्रथा सरांनी आणली

मिलिंद मोहिते- (Dy.sp)

रश्मी नांदेडकर

मला मुलाखतीच्या वेळी भगीरथ स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक श्री रंजन कोळंबे सरांनी अतिशय महत्वपूर्ण असे सहकार्य केले मा सरांनी आम्हाला चालू घडामोडी, वैकल्पिक विषय यांची उत्तम माहिती दिली इतिहास हा माझा वैकल्पिक विषय सरांनी खूपच मुळातून घेतला त्याचा खुप फायदा झाला विशेष म्हणजे सरांनी मला अभिरुप मुलाखतीत वैकल्पिक विषयांचे जे प्रश्न विचारले, त्याच स्वरुपाचे प्रश्न आयोगाच्या पॅनलमध्ये कोकाटे सरांनी मला विचारले त्यामुळे भगीरथ Šलासेसचे माझ्या यशामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे

रश्मी नांदेडकर- (Dy.sp)

कपिल पवार

प्रशिक्षकाची दिग्दर्शकाची निर्मात्याची भूमिका स्पर्धा परीक्षेत आमचे श्री रंजन कोळंबे सर निभवत आहेत त्यातूनच माझ्यासारखे अधिकारी घडत आहेत स्पर्धा परीक्षा आणि श्री रंजन कोळंबे सर हे समीकरण अवघ्या महाराष्ट्राला परिचीत आहे सरांचे मार्गदर्शन मला माझ्या प्रत्येक टप्पयावर लाभले माझ्या यशात कोळंबे सरांचा फारच मोलाचा वाटा आहे सरांबद्दल मला फक्त एकच वाŠय म्हणावेसे वाटते की, श्री रंजन कोळंबे सर हे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अद्वितीय व्यक्तीमत्व आहे

कपिल पवार- (महा वित्त व लेखाधिकारी)

‘आज मला मिळालेले हे यश कोळंबे सरांना वगळून शŠयच नव्हते, भगीरथ च्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून सरांनी चालवलेली यशस्वी, प्रामाणिक धडपड मी प्रत्यक्षपणे पाहत आहे कठीण विषय सोपे करुन असंख्य विद्यार्थांना अभ्यास सुलभ करण्यात भगीरथने मिळविलेले यश अमूल्य आहे प्रत्येक विषय तळमळीने, पूूर्ण झोकून देवून शिकवणारे, अत्यंत मन मिळावू, विद्यार्थीप्रिय व कधीही मार्गदर्शनास तयार असणारे अशी सर्वसामान्य विद्यार्थांमध्ये सरांची प्रतिमा आहे ही प्रतिमा अशीच अबाधीत ठेऊन स्पर्धापरीक्षेच्या ज्ञानाची गंगा सर्वदूर पसरविणारे भगीरथ हे नाव चीरकालासाठी सार्थ ठरविण्यासाठी मनापासून सदिच्छा, शुभेच्छा !

अशोक नखाते- (Dy.sp)

डॉ शामकांत पाटील

माझ्या यशामध्ये श्री रंजन कोळंबे सरांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले निश्चित गुरुशिवाय यश नाही योग्य गुरु मिळणे यासाठी भाग्यच लागते श्री रंजन कोळंबे सरांचे स्थान माझ्यासाठी गुरुचेच आहे पुढील यशासाठी त्यांचे मार्गदर्शन व आशिर्वाद सतत मिळत राहोत हीच प्रार्थना

डॉ शामकांत पाटील- (कक्ष अधिकारी)

डॉ सदाशिव पददुणे

कोळंबे सर म्हणजे एक अशी युनिर्व्हसिटी जिच्यात कोणताही अवघड विषय तो सहजतेने शिकावयास मिळतो

डॉ सदाशिव पददुणे- (तहसिलदार)

रोहिणी फडतरे

कोळंबे सरांच्या शिकविण्याच्या पद्धतीमुळे सर्वच विषय आवडायला लागले माझा बॅंकिंग या वैकल्पिक विषयाची निवड (जुन्या अभ्यासक्रमातील)केवळ हा विषय कोळंबे सर शिकवतात व त्यामुळे आपल्याला या विषयाच्या अभ्यासात कोणताच प्रॉब्लेम येणार नाही या विश्वासावर आधारलेली होती सरांच्या अर्थशास्त्र आणि विज्ञान विषयातले परिपूर्ण ज्ञान तसेच प्रत्येक विद्यार्थांपर्यंत ते ज्ञान पोहचविण्याची धडपड या गोष्टी प्रेरणादायी ठरल्या

रोहिणी फडतरे- (तहसिलदार)